हिप रिप्लेसमेंट सर्जरी ही हिप वेदना दूर करण्यासाठी असणारी एक शस्त्रक्रिया आहे. हीप रिप्लेसमेंट सर्जरी मध्ये हीप जॉइंट मधील खराब झालेले किंवा निकामी हाड काढून त्या ठिकाणी कृत्रिम हिप जॉईंट म्हणजेच प्रोस्थेसिस बसवतात. हिप रिप्लेसमेंट सर्जरी मध्ये ही जॉइंट मध्ये असणारे हीप बोन आणि बॉल हे दोन्ही भाग बदलू शकतात किंवा दोन्हीपैकी एक भाग सुद्धा बदलू शकतात. हिप रिप्लेसमेंट सर्जरी ही वृद्ध व्यक्तींना हीप जॉइंटच्या ज्या समस्या जाणवतात त्यासाठी केली जाते परंतु काही वेळा तरुण रुग्णांना सुद्धा ही रिप्लेसमेंट सर्जरीची आवश्यकता भासू शकते. ही रिप्लेसमेंट सर्जरी केल्यामुळे दैनंदिन ऍक्टिव्हिटीज सुरळीत करता येतात तसेच डॉक्टरच्या सल्ल्यानुसार व्यायाम करता येतात.
हिप रिप्लेसमेंट सर्जरी केव्हा केली जाऊ शकते ? When can hip replacement surgery be done?
१. आर्थरायटिस ( Arthritis )
ऑस्टियोआर्थरायटिस : ज्यावेळी हिपजॉईंटच्या कार्टिलेजचा हळूहळू नाश होतो.
रुमेटॉईड आर्थरायटिस : ज्यावेळी इम्युन सिस्टीम ही हिप जॉईंटच्या भागांना हल्ला करते.
पोस्ट ट्रॉमॅटीक आर्थरायटिस : यामध्ये हीप जॉइंटला झालेल्या जखमांमुळे कार्टिलेज नष्ट होतो.
या अशा परिस्थितीमध्ये हीप रिप्लेसमेंट सर्जरी केली जाऊ शकते.
२. जर हिप जॉईंटला गंभीर असे फ्रॅक्चर झालेले असेल किंवा हाडे तुटलेली असतील तर अशावेळी सुद्धा हीप रिप्लेसमेंट सर्जरी केली जाऊ शकते.
३. हीप जॉईंटच्या असामान्य विकास झाल्यामुळे किंवा काही विकृतीमुळे जॉईंट डिस्टर्शन निर्माण होऊ शकते. जर असामान्य हिप डेव्हलपमेंट झाली तर अशावेळी सुद्धा ही रिप्लेसमेंट सर्जरी करण्याची आवश्यकता भासू शकते.
४. काही रुग्णांमध्ये हीप जॉईंट खराब होण्याचे कारण हे अनुवंशिक सुद्धा असू शकते. जर हिप जॉईंट काही कारणास्तव खराब झाले तर अशावेळी ही रिप्लेसमेंट सर्जरी करावी लागू शकते.
५. हीप रिप्लेसमेंट सर्जरी करण्याची इतर सुद्धा काही कारणे असू शकतात जसे की संधिवात, हिप मध्ये ट्यूमर, इतर काही दुखापत होणे.
हीप रिप्लेसमेंट सर्जरीचे प्रकार -Types of Hip Replacement Surgery
हीप रिप्लेसमेंट सर्जरी दोन प्रकारांमध्ये केली जाते :
१. टोटल हीप रिप्लेसमेंट
२. हिप रिसरफेसिंग
१. टोटल हीप रिप्लेसमेंट –
हीप रिप्लेसमेंटच्या या प्रकारामध्ये हीप जॉईंटच्या दोन्ही भागांना म्हणजेच फेमोरल हेड / बॉल आणि ऍसिटॅबुलम / सॉकेट बदलले जाते.
२. हिप रिसरफेसिंग –
ही रिप्लेसमेंटच्या या प्रकारामध्ये हीप जॉईंटच्या बॉलला बदलले जाते.
हिप रिप्लेसमेंट सर्जरीचे फायदे –
१. हीप रिप्लेसमेंट सर्जरी केल्यामुळे हीप जॉईंटची वेदना कमी होण्यामध्ये मदत होते.
ज्या व्यक्तींना हीप जॉईंट संबंधी जास्त समस्या असतात त्यांना त्यांची दैनंदिन जीवनशैली पुन्हा सुरळीत सुरू करता येऊ शकते.
२. हिप रिप्लेसमेंट सर्जरीमुळे चालण्याच्या कार्यक्षमतेमध्ये सुद्धा सुधारणा होऊ शकते.
३. हीप जॉईंटचे प्रॉब्लेम असल्यामुळे ज्या ऍक्टिव्हिटीज करता येत नव्हत्या त्या करता येतील, शरीराची हालचाल चांगल्या प्रकारे करता येईल.
४. हीप रिप्लेसमेंट सर्जरी केल्यामुळे हीप जॉईंटच्या समस्या कमी होतील त्यामुळे वेदना जाणवणार नाहीत, मानसिक समाधान मिळेल.
Read More Blogs- Tips to Reduce Knee Pain
हीप रिप्लेसमेंट सर्जरी मधील जोखीम -Risks in Hip Replacement Surgery
हीप रिप्लेसमेंट सर्जरी मध्ये काही जोखीम सुद्धा आहे, ते पुढील प्रमाणे :
१. हीप रिप्लेसमेंट सर्जरी झाल्यानंतर ब्लड क्लॉटस तयार होण्याचा धोका असू शकतो.
२. हीप रिप्लेसमेंट सर्जरीमुळे इन्फेक्शन होण्याचा धोका संभवू शकतो.
३.रुग्णांच्या काही केसेसमध्ये कृत्रिम हिप जॉईंट नैसर्गिक हीप जॉईंट प्रमाणे त्वरित काम करत नाही.
४. रुग्णांच्या काही केसेस मध्ये हिप रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये जे कृत्रिम भाग बसवलेले असतात त्यामुळे वेदना जाणवू शकतात.
५.रुग्णांच्या काही केसेसमध्ये हिप रिप्लेसमेंट सर्जरी झाल्यानंतर ज्या पायाचे ऑपरेशन झाले आहे तो पाय दुसऱ्या पायापेक्षा छोटा किंवा मोठा होऊ शकतो.
६.काही रुग्णांना हिप रिप्लेसमेंट केल्यामुळे अस्वस्थता जाणवू शकते.
७. हीप रिप्लेसमेंट सर्जरी दरम्यान जवळच्या नसांना दुखापत होऊ शकते.
८.तात्पुरती सांधेदुखी जाणवू शकते.
हीप रिप्लेसमेंट सर्जरीनंतर -After Heap Replacement Surgery
१. हीप रिप्लेसमेंट सर्जरीनंतर नक्कीच रुग्णाला काळजी घ्यावी लागते, काही कालावधीसाठी विश्रांतीची गरज असते.
२. हिप रिप्लेसमेंट सर्जरी झाल्यानंतर रुग्णाचे पाय हलवण्यासाठी तसेच मसल्सला ताकद देण्यासाठी फिजियोथेरेपी दिली जाऊ शकते.
३. हीप रिप्लेसमेंट सर्जरी झाल्यानंतर रुग्णांना काही दिवसांकरिता दवाखान्यांमध्ये ठेवले जाते, काही दिवसानंतर जे रुग्ण घरी व्यवस्थित काळजी घेऊ शकतात त्यांना घरी सोडले जाते.
४. हीप जॉईंट वर जास्त प्रमाणामध्ये दबाव येऊ नये यासाठी वजन सुद्धा नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.
५. डॉक्टरांमार्फत हीप रिप्लेसमेंट सर्जरीनंतर योग्य ते औषधोपचार केले जातात.
६. हिप रिप्लेसमेंट सर्जरी झाल्यानंतर वेळोवेळी डॉक्टरांचा फॉलोअप घेणे, डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
७. डॉक्टर जोपर्यंत गाडी चालवण्याचा सल्ला देत नाहीत तोपर्यंत किंवा या प्रकारच्या इतर ऍक्टिव्हिटी करण्याचा जोपर्यंत सल्ला देत नाही तोपर्यंत करू नयेत.
हिप रिप्लेसमेंट ही सर्जरी जर खरोखरच आवश्यक असेल तर डॉक्टरांमार्फत तसा सल्ला दिला जातो. तत्पूर्वी हीप रिप्लेसमेंट सर्जरीचे फायदे आणि त्यामध्ये असणारी जोखीम लक्षात घेणे गरजेचे आहे. हीप रिप्लेसमेंट सर्जरी केल्यामुळे ज्या रुग्णांना हीप जॉईंटचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा येऊ शकते. हीप रिप्लेसमेंट सर्जरी बद्दल कुठलीही शंका किंवा प्रश्न असतील तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
For Hip replacement surgery in Baramati, Sushila Accident Hospital is a top choice. With expert doctors, advanced facilities, and dedicated post-surgery care, they ensure effective treatment and a smooth recovery. Contact Sushila Accident Hospital for reliable hip replacement surgery in Baramati